१५ जानेवारीपासून तपासणी मोहीम जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराला मुळापासून आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्यासाठी 'अरुणोदय' ही विशेष तपासणी मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रूवारी दरम्यान सर्व प्रा .आ . केन्द्र , ग्रामीण रुग्णालय, उपकेन्द्र , आरोग्य संस्थांमध्ये मोफत तपासणी होणार आहे