प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत मेंढोली येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
7.3k views | Yavatmal, Maharashtra | Mar 10, 2025 यवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरपूर अंतर्गत मेंडोली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 125 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार माननीय संजयजी दरेकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सागर जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.थेटे वैद्यकीय अधिकारी डॉ. जांबुळे व इतर कर्मचारी, आशा,गटप्रवर्तक यांनी सहकार्य केले.