वर्धा: मत्स्यव्यवसाय कार्यालयात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा
Wardha, Wardha | Jul 11, 2025 सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय व जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ मर्यादित वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यव्यवसाय कार्यालयात मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष कमलेश मारबडे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ही माहिती आज जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे.