ठाणे - आपला परिसर डासमुक्त करा, हिवतापा पासून सुरक्षित रहा.
1k views | Thane, Maharashtra | Apr 24, 2025 ठाणे- हिवताप हा आजार व्यक्तीला डास चावल्यामुळे होतो. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी डासांचा नायनाट करून त्यांची पैदास वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, नाल्या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडणे, प्रवाहित पाण्यामध्ये टेमीफॉस सोडणे या सारख्या कृती डासांची वाढणारी पैदास थांबवू शकतात.