महाड: शासकीय विश्रामगृह, रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत विकासकामांचा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा आढावा
Mahad, Raigad | Sep 15, 2025 आज सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास शासकीय विश्रामगृह, रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा व एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान प्रकल्पग्रस्त नागरिकांनी त्यांच्यावर येणाऱ्या अडचणी आणि इतर समस्या मांडल्या. काही तातडीच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यात आला आहे.