पनवेल: पनवेल तालुक्यात भाजपच्या प्रचाराला वेग; वडघर मुस्लिम मोहल्ल्यात भाजप महायुतीची जंगी सभा
Panvel, Raigad | Feb 3, 2026 पनवेलमध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर वडघर जिल्हा परिषद गटाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार सोनाली जितेकर आणि वडघर पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना वास्कर यांच्या प्रचारार्थ वडघर मुस्लिम मोहल्ला येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.