धुळे: धुळ्यातील वडजाई रोडवर माजी आमदार फारुक शहांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवार गट राष्ट्रवादीत प्रवेश
Dhule, Dhule | Sep 21, 2025 धुळे शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार फारुक शहा यांच्या नेतृत्वाखाली देवपूर परिसरातील नागरिक व मानव अधिकार संघटनेचे शेकडो कार्यकर्ते अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. अजित पवार यांचे विकासाभिमुख व सेक्युलर नेतृत्व तसेच शहा यांचे जातपात विरहित कार्य यावर विश्वास ठेऊन हा प्रवेश झाला. या सामूहिक प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढून नवीन राजकीय समीकरणे घडण्याची शक्यता आहे.