सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराला मुळापासून आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्यासाठी 'अरुणोदय' ही विशेष तपासणी मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे सिकलसेलमुक्त गोंदियाच्या दिशेने 'अरुणोदय' ही एक निर्णायक पायरी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने रक्ततपासणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे. ' डॉ पुरुषोतम पटले जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया