मेहकर: बसचालकास पारखेड फाट्यावर मारहाण प्रकरणी जानेफळ पो. स्टे. गुन्हे दाखल
मेहकर तालुक्यामधील शेगाव पालखी मार्गावरील पारखेड फाट्यावर बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केला आहे. खामगाव डेपोची बस खामगांव ते मेहकर बस क्रमांक एमएच २० बीएल ४१७३ वरील चालक मंगलसिंग भावसिंग जोहरे व वाहक राजेश जाधव प्रवाशाला घेऊन जात असताना अंदाजे एक वाजून ४० मिनिटांनी पारखेड फाट्यावर गाडी उभी राहून प्रवासी खाली उतरल्यानंतर गाडी सुरू केलीत्यानंतर हा प्रकार घडला.