राहाता: राधाकृष्ण विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात,उद्धव ठाकरे नी शेतकऱ्यांच्या बांधावर राजकारण करू नये...!
सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली होती, अशी खरमरीत टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पाहणी करणं चांगलं असलं तरी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी त्यात राजकारण करू नये, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.