सेलू: संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी; रविवार पासून घोराड येथे दहा दिवस दरवळणार भक्तीचा सुगंध
सेलू......
Seloo, Wardha | Jan 10, 2026 विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरतीरी वसलेल्या घोराड तीर्थक्षेत्रात संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रविवारी ता. ११ जानेवारी पासून या सोहळ्यास प्रारंभ होणार असून दहा दिवस हा उत्सव चालणार आहे. या दिवसात गावात भक्तीचा सुगंध दरवळणार आहे. यानिमित्ताने सारे गाव एक होण्याची तयारी सुरू झाली आहे. भाविकांनी या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आज ता. १० जानेवारीला दुपारी २ वाजता देवस्थान ट्रस्ट कमिटीने केले आहे. संत केजाजी महाराज य