रामटेक: शिरपूर शिवारातील दूधराम सव्वालाखे यांच्या फार्म हाऊस येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार
Ramtek, Nagpur | Sep 24, 2025 वनपरिक्षेत्र रामटेक अंतर्गत येणाऱ्या रामटेक - तुमसर मार्ग लगतच्या शिरपूर येथील दूधराम सव्वालाखे यांच्या फार्म हाऊस तथा प्रस्तावित वाइल्ड किंग्डम वॉटर टँक शिरपूर येथे बुधवार दिनांक 24 सप्टेंबरच्या सकाळी आठ वाजता च्या दरम्यान एका बिबट्याने हल्ला चढवीत येथील घोड्याचे 5 महिण्याचे पिल्लू अर्थात शिंगरूला ठार केल्याची घटना घडली आहे. मागील वर्षी याच परिसरातील मीताराम सव्वालाखे यांच्या अवंती ऍग्रो फार्म हाऊस मध्ये एका बिबट्याने हल्ला करून घोड्याला ठार केले होते.