नांदगाव: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नागापूर येथे विशेष स्वच्छता अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान एक दिवस गावासाठी स्वच्छतेसाठी स्वच्छ गाव निर्मल गाव या अनुषंगाने नागापूर येथे विशेष स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते यामध्ये गावातील शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते एक दिवस गावासाठी या अभिनव उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच राजाभाऊ पवार यांनी केले