सातारा: कराड येथे नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात, बस वीस फूट खड्ड्यात कोसळली
Satara, Satara | Dec 2, 2025 कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड जवळ नाशिकच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांची बस २० फूट खड्ड्यात कोसळली आहे. या बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी प्रवास करत होते, या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे-बंगळुर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे सातारा ते कराड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यात वळणे आहेत. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स आहेत. रस्त्याच्या बाजूने खुदाईचे काम सुरू आहे. यामुळे दररोज अपघात होत आहेत.