जालना: पाथरूड आठवडी बाजाराकडे जात असताना सोन्या-चांदीच्या व्यापार्याची लूट, सेवली पोलिसांची काही तासांत यशस्वी उकल
Jalna, Jalna | Dec 15, 2025 नेर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी संतोष बळीराम बोंद्रे हे आपले दागदागिने घेऊन मोटरसायकलवरून पाथरूड येथील आठवडी बाजाराकडे जात असताना बाबर पोखरी पाटीजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देत साडेदहा लाखाचे दागीने चोरुन नेले होते. सोमवार दि. 15 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार चाकूचा धाक दाखवून अंदाजे साडेदहा लाख रुपये किमतीचे सोने-चांदी असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला.