यवतमाळ: शहरातील अग्रवाल ले आउट येथून दुचाकी लंपास ; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
यवतमाळ शहरातील अग्रवाल ले आउट येथे उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी घडली असून सदर प्रकरणी सुनील हेमनानी यांच्या फिर्यादीवरून 6 ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.