बाभूळगाव: पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीस मारहाण,नांदे सावंगी येथील घटना
फिर्यादी ज्योत्स्ना सचिन ठोंबरे यांच्या तक्रारीनुसार नऊ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास फिर्यादीचा पती सचिन ठोंबरे हा दारू पिऊन घरी आल्यानंतर फिर्यादिस पैसे मागितले असता फिर्यादी ने माझ्या जवळ पैसे नाही असे म्हटले असता आरोपी पतीने वेळवाच्या काठीने फिर्यादीस मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी नऊ नोव्हेंबरला सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.