घाटंजी: खापरी नाक्याजवळ लाकडाची तस्करी करणारे वाहन जप्त,वन विभागाची कारवाई
घाटंजी वनविभाग नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना गोपनीय बातमीदाराकडून खैर जातीच्या लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली असता घाटंजी वनविभागातील वनपरिक्षेत्राधिकारी चेतन नेहारे यांनी खापरी नाक्याजवळ सापळा रचला व भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच 29 9232 या क्रमांकाच्या टाटा 407 वाहनाला थांबविण्यात आले असता ते थांबले नाही तेव्हा त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला असता आरोपी वाहन सोडून पसार झाले.तेव्हा वाहन व वाहनातील लाकडे असा एकूण तब्बल दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...