खेड: चाकण-तळेगाव रोडवर सुदवडी परिसरात गांजासह एकाला पकडले
अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून सुदवडी परिसरातून एका तरुणाला गांजाची विक्री करताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.याप्रकरणी पोलीस शिपाई रणधीर माने यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश अशोक भांडवलकर (२६, शिंदेवस्ती, सुदवडी, मुळ रा. भांबरडे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.