हिंगणघाट: घरसंसार बचतगटाचे कामे करताना महिलांनी स्वताच्या आरोग्याला सुध्दा जपावे:आमदार समिरभाऊ कुणावार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद योजना संचलित संघर्ष प्रभाग संघ, कांढळी येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समिरभाऊ कुणावार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे, बाळाजी इंगोले, अमोल त्रिपाठी, सौ संध्याताई मडावी(सरपंच),आदी उपस्थित होते.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार म्हणाले की महिलांवर घरातील संपूर्ण जवाबदारी असुन त्या घरातील सर्व मंत्रायलाचा कारभार चोखपणे चालवितात.