दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या व काट्याच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाच्या पंचशीला इंगोले यांनी शिवसेना शिंदे गटाच्या लक्ष्मी कलोसे पवार यांचा अवघ्या ६२ मतांनी पराभव करून विजय मिळवला. आज दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अधिकृत रित्या जाहीर झालेल्या या निकालामुळे दिग्रसमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.२५ सदस्यीय नगरपरिषदेत १६ नगरसेवक शिंदे शिवसेनेचे, ६ ठाकरे शिवसेनेचे, तर भाजप, एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी १ विजयी झाले.