ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणखैरा येथे सार्वजनिक ठिकाणी सट्टापट्टी घेणाऱ्या मंगेश विनायक धमगाये (३६) रा. गणखैरा, ता. गोरेगाव याच्याविरुद्ध २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करण्यात आली. आरोपीजवळून ११० रुपये रोख व सट्टापट्टी घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार मनोज भैसारे करीत आहेत. .......