कोपरगाव: वेळापुरात वाढदिवसाच्या वादातून मित्रानेच लावली आग; मोटरसायकल जळून खाक
कोपरगाव तालुक्यातील वेळापुर गावात किरकोळ कारणावरून पेटलेला वाद थेट आग लावण्यापर्यंत पोहोचला आहे.वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने घरासमोर उभी असलेली मोटरसायकल पेटवून दिल्याची घटना ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली.याबाबत 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता तालुका पोलिसांनी माहिती दिली.