चाळीसगाव: १९ दिवसांच्या 'नकुशी'ची मायेची भेट; पोलिसांनी जुळवले बाळ आणि माता-पित्याचे नाते
चाळीसगाव (प्रतिनिधी): अवघ्या १९ दिवसांच्या निरागस बाळाला आजी-आजोबांकडे सोडून पळ काढणाऱ्या प्रेमविवाहित माता-पित्याचा अखेर चाळीसगाव शहर पोलिसांनी शोध लावला आहे. अत्यंत संवेदनशीलतेने तपास हाताळत पोलिसांनी या दाम्पत्याला प्रेमाचा धडा देत झालेल्या चुकीची जाणीव करून दिली. पुन्हा अशी आगळीक न करण्याच्या अटीवर पोलिसांनी त्या चिमुकलीला तिच्या माता-पित्याच्या स्वाधीन करून सुखी संसाराचा सल्ला दिला आणि ताटातूट झालेले माय-लेकराचे नाते पुन्हा जुळवले. पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी