येथील नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती आरक्षण आहे. अध्यक्षपद आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयंत तयारी केली असून सत्तेसाठी एकमेकाविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढत असल्याने ही निवडणूक तिरंगी व चुरशीची होणार आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अजय कोठेवार यांनी आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला.