नागपूर ग्रामीण: खड्ड्यांनी त्रस्त नागरिक –मनसेचे आंदोलन
#त्रास #आंदोलन @मनसे
हिंगणा-कान्होलीबारा मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांचं हाल होत आहे. या रस्त्यावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झेंडे लावून आणि त्यात फुले टाकून प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध केला. त्यांनी सांगितलं की, रस्ता दुरुस्ती तातडीने न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्यात येईल. स्थानिक नागरिकांनीही मनसेच्या या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद दिला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.