गंगाखेड: अतिवृष्टीमुळे पावणे पाच लाख हेक्टर वरील पिके धोक्यात, माखनी परिसरात पुन्हा अतिवृष्टी, अधिकाऱ्यांनी केली पाहणी
परभणी जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पावणेपाच लाख हेक्टर वरील सोयाबीन कापूस पिके धोक्यात आली आहेत सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यात माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी सिरसम व इतर गावांमध्ये दरम्यान झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला. घराचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दुपारी बारा वाजता भेट देऊन पाहणी केली