पत्राचाळीच्या गुन्हेगारांनी एसआरएवर बोलू नये – भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन
आज मंगळवारी सकाळी १० वाजता भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, पत्राचाळीतील गुन्हेगारांनी एसआरएवर बोलू नये. राऊतांकडे पुरावा असल्यास तो सादर करावा, अन्यथा खोटे आरोप पसरवू नयेत. बन यांनी कोविड काळात झालेल्या घोटाळ्यांची आठवण करून देत, मृतांच्या टाळूवर लोणी खाणाऱ्यांना एसआरएवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप केला.