चंद्रपूर: पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा उद्या 17 सप्टेंबरला चंद्रपूर दौरा
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 17 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.45 वाजता नागपूरवरून चंद्रपूरकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता मोरवा (ता. चंद्रपूर) ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थिती, सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी 12 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव राहील.