उमरखेड: छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील समोरील भेडच्या दुकानाला लागली आग
उमरखेड शहरातील महागाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान समोरील भेडच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. परंतु घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली व आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.