जालना: अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल.वेचणीला आलेलं पांढरं सोनं शेतातच भिजतंय, बळीराजा चिंतेत
Jalna, Jalna | Nov 2, 2025 आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यात धुमाकुळ घातल्यानंतर आता मागील 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांचं वेचणीला आलेलं पांढरं सोनं शेतातच भिजून काळवंडू लागलंय. यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडलेत. जालन्यातील अनेक शेतकऱ्यांचा वेचणीला आलेला कापूस शेतातच भिजत असल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. भिजलेला कापूस या शेतकऱ्