सेलू: विकास चौकातील नवचैत्यन्य बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती उत्सव थाटात आणि उत्साहात संपन्न
Seloo, Wardha | Oct 10, 2025 सेलू येथील नवचैत्यन्य बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचे आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या पारंपरिक वर्षावास वाचनाचा समारोप गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता उत्साहात आणि थाटात संपन्न झाला. याप्रसंगी केळझर येथील धम्मभूमीचे 70 प्रशिक्षणार्थी श्रामणेर यांच्या उपस्थितीत विकास चौकापासून बुद्धविहारापर्यंत भव्य धम्मरॅली काढण्यात आली.