संविधान दिवसाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. 26 नोव्हेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अनिल सुब्रमण्यम उपस्थित होते.