हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 19 मिमी पाऊस वाकोडी व डोंगरकडा या दोन मंडळात अतिवृष्टी
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कळमनुरी तालुक्यात सर्वात जास्त 42.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी 2.4 मि.मी. पाऊस पडला आहे. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी व डोंगरकडा मंडळात अतिवृष्टी झाली असून वाकोडी मंडळात 66 मिमी व डोंगरकडा मंडळात 79 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज 15 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत नोंदला आहे.