आज शिवनफळ–नाड येथील सरपंच नागेश्वरजी उपरे तसेच गावातील मान्यवर नागरिकांनी विविध विकास कामांबाबत निवेदन सादर केले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती त्यांनी सविस्तरपणे मांडली. त्यांच्या सर्व योग्य मागण्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी आनंदराव राऊत यांनी दिले. गावाच्या विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे.