भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय येथे मोठ्या उत्साहात आज दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात 'बालिका दिन' आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.