उरण: चिरनेर व पंचायत समिती उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९५ वा हुतात्मा स्मृतीदिन कार्यक्रम
Uran, Raigad | Sep 25, 2025 २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील तेजस्वी लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अमर हुतात्म्यांना कृतज्ञतेचा अभिवादन समारंभ गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वा. चिरनेर येथे संपन्न झाला. कार्यक्रमास समस्त नागरिक, समाजसेवक, पत्रकार, हुतात्मा व स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक तसेच विविध सहकारी, शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, कर्मचारीवर्ग आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केले.