उमरी: शहरातील गोविंदराज ड्रेसेस समोरून अज्ञात चोराने नेली मोटर सायकल चोरून, उमरी पोलिसांत गुन्हा नोंद
Umri, Nanded | Nov 18, 2025 दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास उमरी शहरातील गोविंदराज ड्रेसेस दुकाना समोरील रोडवर फिर्यादी शिवाजी जाधव यांनी आपली पॅशन प्रो कंपनीचे मोटरसायकल उभी केली असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने सदरची 50 हजार किंमतीची मोटरसायकल चोरून नेली होती, मोटर सायकल क्र. MH-26-AH-8452 असा आहे, सदरची मोटरसायकल चोरून नेल्याप्रकरणी त्याने उमरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद केल्या आहेत, सदर घटनेचा अधिकचा तपास पोहेकॉ कोलबुद्धे हे करत आहेत.