सेलू पोलिसांनी टाकळी (झडशी) शिवारात शनिवारी (ता. ८ डिसेंबर) दुपारी ४.३० च्या सुमारास गावठी दारू बनविणाऱ्या भट्टीवर धाड टाकत धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत सुमारे ₹८५,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. वैभव बाबाराव तळवेकर (वय ३३, रा. वार्ड क्र. ३, झडशी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.