वाशिम: प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुली सोबत लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
Washim, Washim | Oct 1, 2025 वाशिम येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने विशेष बाल संरक्षण प्रकरणांमध्ये आरोपीस दोषी ठरवून त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी देण्यात आली. सदर प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून सुचिता कुलकर्णी यांनी काम बघितले सदर गुण्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे यांनी केला