पंढरपूर: विठ्ठल कारखाना दिवाळीसाठी दोनशे रुपयांचा हप्ता देणार, तर 3500 बिल देण्यास कटीबद्ध : आमदार अभिजीत पाटील
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना दिलेला शब्द पाळणार असून तीन हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांचे उसाचे बिल देणार आहे. दिवाळीसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून दोनशे रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे. ते आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.