कुरखेडा: वनपरिक्षेत्र कार्यालय कूरखेडा यांचा वतीने बिबट या हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करण्याकरीता जनजागृति चित्रफीत प्रकाशित
परीसरात मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे भक्ष्याचा शोधात वन्यप्राणी मानव वस्तीकडे येत आहेत यामूळे मानव व वन्यजीव दोघांचाही जिवाला धोका निर्माण होते विषेशता कूरखेडा वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट चे मोठे अस्तीत्व आहे तसेच लगतचा अर्जुणी ( मोर) तालूक्यात नूकताच बिबटचा हल्ल्यात ५ वर्षीय बालकाचा मृत्यु झाला या पार्शभूमीवर आज दि.२७ सप्टेबंर शनिवार रोजी दूपारी २ वाजता रोजी बिबट पासून बचावचा जनजागृति चित्रफीत वनपरिक्षेत्र कार्यालय कूरखेडा यांचा वतीने प्रसिद्ध करण्यात आली.