नेवासा: हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगार सोनई पोलिसांच्या ताब्यात
सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत बेकायदेशीररित्या लोखंडी हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारास सोनई पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले. संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर, रा.सोनई यांच्या पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले असता त्याच्याकडून लोखंडी कत्ती, एक दुचाकी, दोन मोबाईल असा मुद्देमाल सोनई पोलिसांना मिळून आला.