गडचिरोली: चामोशी - मुल मार्गावर भव्य रास्ता रोको जनआंदोलन, तालुका प्रशासनाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको व जनआंदोलन मागे
चामोर्शी मूल मार्गावर चामोर्शी चाकलपेठ फाट्यासमोर भव्य रास्ता रोको जन आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक आशिष पिपरे व राष्ट्रीय लोकहित सेवा जिल्हा अध्यक्ष -रमेश अधिकारी ,काळी पिवळी चालक-मालक संघटनेचे अमर पठाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी तालुका प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे सदरआंदोलन स्थगित करण्यात आले तालुका प्रशासनाने रास्ता रोको आंदोलनास भेट देऊन निवेदन स्वीकारले