सुनिल माळी रा.डागपिंपळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अधीकचीं माहिती अशी की काल 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास फिर्यादीचा लहान भाऊ गणेश सोमनाथ माळी व त्याचे मित्र सिध्दार्थ महांकाळे व बाळू अंकुश निकम दोन्ही रा. डागपिपळगाव हे सिध्दार्थ महांकाळे याची मोटर सायकल क्र.MH.17.AQ.2294 हीवर बसुन डागपिपळगावकडे येत असतांना सुंदर राशिनकर यांचे घराजवळील डांबरी रोडवर पाठीमागुन येणा-या एका अशोक लेलण्ड कंपनीच्या काळया पिवळ्या रंगाच्या हायवाने धडक दिली.