दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मरारटोली गोंदिया येथे दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गोवर्धन पूजनाची परंपरा कायम आहे. शेकडो वर्षाची परंपरा आदिवासी गोंडगोवारी समाजाकडून जपली जाते. यावेळी गोंडगोवारी समाजाकडून गायगोधन पूजा करण्यात आली. विदर्भातील गोवारी समाजातर्फे दीपावली पाडव्याच्या दिवशी ही पूजा करण्याची प्रथा असून यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.