जालना: राष्ट्रीय हरित सेना आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने पर्यावरण पूरक प्रदूषणमुक्त दीपावलीचा संकल्प
Jalna, Jalna | Oct 15, 2025 राष्ट्रीय हरित सेना आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पर्यावरण पूरक आणि प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसान या उपक्रमास जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला.या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना दीपावली हा दिव्यांचा सण असल्याचे सांगून फटाके फोडल्यामुळे होणारे प्रदूषण टाळणार आहे.