दिनांक १४ डिसेंबर रोजी तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत चांदोरी खुर्द या गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली. मा.जिल्हाधिकारी प्रजित नायर मा.पोलीस अधीक्षक गोरख भामरे मा.अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि मा.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेश्मा आर.मोरे यांचे मार्गदर्शनात दामिनी पथक जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाइन इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया आणि तिरोडा पोलीस स्टेशन यांची टीम तयार करून प्राप्त माहिती नुसार होऊ घातलेल्या विवाहाती