बोदवड: सारोळा येथून मुक्ताईनगर ला कम्प्युटर क्लासला जाते असे सांगून निघालेली तरुणी बेपत्ता,मुक्ताईनगर पोलिसात हरवल्याची तक्रार
Bodvad, Jalgaon | Nov 13, 2025 सारोळा या गावातील रहिवाशी दीक्षा सुरेश वाघ वय २० ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी मुक्ताईनगर शहरातील गजानन कॉम्प्युटर क्लासेसला जात आहे. असे सांगून घरून निघालेली ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.