चाकूर: ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Chakur, Latur | Sep 18, 2025 चाकूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील चाकूर, दि. १८ : प्रत्येक व्यक्तीने आरोग्याविषयी सजग राहायला हवे. यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले. चाकूर ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने आयोजित 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.